महाराष्ट्र
रत्नागिरीत डेल्टा प्लसचे रुग्ण, चिंता वाढली
रत्नागिरी जिल्ह्यातील 164 जणांचे 4 ऑगस्ट रोजी आरटीपीसीआर करून त्यांचे सॅम्पल दिल्ली येथील लॅब मध्ये पाठवण्यात आले होते. 15 ऑगस्ट रोजी तीन रुग्णांना डेल्टा प्लस पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला. यामध्ये दोन महिला व एक पुरुष असा समावेश आहे.
त्यापूर्वीच त्याच्यावर उपचार करून त्याना घरी सोडण्यात आले होते. तर काळजी म्हणून संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावंच लसीकरण 8.0 व अंतरवली गावचे लसीकरण 26.0 झाले आहे.
सद्यस्थितीत दोन्ही गावात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. सुरुवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात 16 रुग्ण सापडले होते. मात्र आता एकही डेल्टा प्लसचा रुग्ण नसल्याची माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी बी एन पाटील
यांनी दिली.