Delhi Airport Roof Collapse: दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 वर छत कोसळंल; एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी
जोरदार पाऊस आणि वाऱ्यानंतर दिल्ली विमानतळावर अपघात झाला आहे. दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-1 वर छत कोसळलं. छत कोसळल्याने छताखाली कार अडकल्या आहेत. या अपघातामुळे 4 जण जखमी झाले आहेत. छत कोसळल्याने दिल्ली विमानतळावरील रस्ते वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. छत कोसळल्याने अनेक हवाई उड्डाणं रद्द होण्याची शक्यता आहे.
अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, छत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, विमानतळाच्या टर्मिनल-1 चे छत कोसळल्याची माहिती सकाळी 5.30 च्या सुमारास मिळाली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी विमानतळावर जाऊन अपघातस्थळाची पाहणी केली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना 20 लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जखमींना सरकार 3 लाख रुपयांची मदत देणार आहे. जो भाग कोसळला तो 2009 मध्ये बांधण्यात आल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.