Deepali Chavan suicide case; बेलदार समाज रस्त्यावर उतरणार

Deepali Chavan suicide case; बेलदार समाज रस्त्यावर उतरणार

Published by :
Published on

मेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी आता बेलदार समाज आक्रमक झाला आहे. बेलदार समाजाने हे प्रकरण फास्ट ट्रँक कोर्टात चालवण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोपी DFO विनोद शिवकुमार यांना अटक करण्यात आली आहे. तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पचे वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात बेलदार समाज आक्रमक झाली आहे. ज्या प्रकारे आरोपी DFO विनोद शिवकुमार यांना अटक करण्यात आली त्याप्रमाणे निलंबित मेळघाट व्याघ्र प्रकल्पचे वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी. तसेच या प्रकरणाची सीआयडी व एनआयए संस्थेमार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच हे प्रकरण फास्ट ट्रँक कोर्टात चालवून या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान दिपालीला न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र बेलदार समाज संघटनेचे अध्यक्ष राजू साळूंके यांनी दिला आहे. अमरावतीतील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com