एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी

एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी

वानखेडेंनी गोरेगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली
Published on

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांना समीर वानखेडेंना धमकी जीवे मारण्याची धमकी आली आहे. याप्रकरणी वानखेडेंनी गोरेगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही धमकी मिळाल्याचे समोर येत आहे.

मुंबईतील क्रुझ ड्रग्स प्रकरणावेळी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले होते. समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा आरोपही मलिकांनी केला होता. परंतु, समीर वानखेडे यांना जातप्रमाणपत्र समितीकडून क्लीनचिट मिळाली. मुंबई जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने समीर वानखेडे हे मुस्लीम नसल्याचा निर्वाळा दिला. यानंतर समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलिस नवाब मलिक यांच्याविरुद्ध मानहानीच्या आरोपाखाली तक्रार नोंदवली होती.

या तक्रारीनंतर समीर वानखेडे यांना धमक्या मिळत असल्याच्या आरोप करण्यात येत आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून समीर वानखेडेंना धमकी जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी वानखेडेंनी गोरेगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com