धक्कादायक! प्रजासत्ताकदिनी प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू

धक्कादायक! प्रजासत्ताकदिनी प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू

नाशिकस्थित जातेगाव येथील घटना
Published on

संदीप जेजुरकर | नांदगाव : नांदगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनीचा प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण कार्यक्रम संपल्यानंतर काढण्यात आलेल्या प्रभात फेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. पूजा दादासाहेब वाघ (वय १५) असे तिचे नाव असून ती नववीत शिक्षण शिकत होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

धक्कादायक! प्रजासत्ताकदिनी प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू
सत्तानंतरानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ठाण्यात; आनंदाश्रमात जाणे टाळले

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे येथील ग्रामपालिकेच्या ध्वजारोहणासाठी जात असताना सुरू असलेल्या प्रभात फेरी दरम्यान पूजाला चक्कर आल्याने ती खाली पडली. तिला तात्काळ उपचारासाठी बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, पूजा हिची प्रकृती गंभीर असल्याने तिला नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले. परंतु, नांदगावला पोहोचण्याअगोदर पूजाचा मृत्यू झाला होता. तिच्यावर शोकाकुल वातावरणात १२ वाजेच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना असतात. त्यातून शक्य तितकी मदत तिच्या पालकांना करणार असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत असलेले सर्व नियोजित सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com