ELectric shock
ELectric shock Team Lokshahi

सांगलीत विजेचा झटका लागून वायरमनचा दुदैवी मृत्यू

संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांकडून मागणी
Published by :
Team Lokshahi
Published on

सांगली : राज्यात सध्या सर्वत्र पाऊस सुरु असून, अनेक भागांत पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे विजपुरवठा खंडीत झाल्याच्या घटना समोर येत आहेत. जीव मुठीत धरुन कर्मचारी आपले काम बजावत असतात. यामध्ये अनेकदा कर्मचाऱ्यांना आपल्या जीवाशी खेळावं लागतं. अशीच एक घटना सांगलीमध्ये विदूत प्रवाहाचे दुरुस्तीचे काम चालु असताना घडली आहे. दुरुस्तीसाठी खांबावर चढला आणि विजेचा शॉक लागून खांबावरच वायरमॅनचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आष्टा या ठिकाणी घडली आहे. अजित बनसोडे असे या मृत कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

ELectric shock
Congress Protest | महागाईविरोधात काँग्रेसचं आंदोलन; नाना पटोलेंसह नेत्यांना रोखण्याचा प्रयत्न

विजेच्या वीजपुरवठ्या मध्ये बिघाड झाल्याने दुरुस्त करण्यासाठी चढला असता अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने जागीच मृत्यू होऊन वायरमन अजित बनसोडे यांचा मृतदेह काही वेळ खांबावर लटकून होता. एसटी स्टँड चौकात लाईटच्या पोलवरती काम करीत असताना ही घटना घडली आहे. आष्टा महावितरण कार्यालयात 32 वर्षीय अजित मुकुंद बनसोडे हे वायरमन म्हणून काम करत होते. गुरुवारी दुपारच्या सुमारास वीज पुरवठा नादुरुस्त झाल्यानं, दुरुस्तीसाठी अजित बनसोडे विजेच्या खांबावर चढले होते.

आष्टा वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे अजित बनसोडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी मृत अजित बनसोडे,यांचा मृतदेह व आष्टा वीज वितरण कार्यालयाच्या दारात नेऊन संबंधितांच्या वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. मृत अजित बनसोडे यांच्या पश्चात्आई,पत्नी,पाच वर्षांचा एक मुलगा व दोन महिन्याचा मुलगा असा परिवार आहे,हे घटनेमुळे भडकंबे व आष्टा येथे हळहळ व्यक्त होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com