महाराष्ट्र
सिल्लोडमध्ये धक्कादायक प्रकार! चक्क तहसील कार्यालयात आणले प्रेत
सिल्लोड येथून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. सिल्लोड तहसील कार्यालयात नाभिक समाजाच्या नागरिकांनी थेट प्रेत आणले आहे.
अनिल साबळे|सिल्लोड: येथून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. सिल्लोड तहसील कार्यालयात नाभिक समाजाच्या नागरिकांनी थेट प्रेत आणले आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नसल्याने नाभिक समाजाने संताप व्यक्त केला असून प्रेत थेट तहसील कार्यलयात आणले होते. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
शिवना येथील नाभिक समाजाच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण असल्याने अंत्यसंस्काराला जागा उपलब्ध नाही. यामुळे सिल्लोड तालुक्यात नाभिक समाजाच्या संतप्त झालेल्या नागरिकांनी सुगंधाबाई दत्तू पंडित यांचे प्रेत, सिल्लोड येथील तहसील कार्यालयात आणले. यादरम्यान नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. तसेच, स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी देखील केली आहे.
नाभिक समाजाने आक्रमक पवित्रा घेतला. तहसील कार्यालय परिसरात मृत व्यक्तीचे नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले आहेत.