Daughter In Law in Army
Daughter In Law in Army

गावातला जवान नाही...तर सुनबाई सैन्यात; प्रशिक्षण घेऊन परतल्यानंतर काढली जंगी मिरवणूक

पूजा खरात ही कायगाव येथील सुनबाई व पालखेड तालुका वैजापूर येथील लेक आहे
Published by :
Published on

अनिल साबळे, सिल्लोड, जि. औरंगाबाद |

एखादा भारतीय सैन्यात असलेला जवान (Indian Soldier) गावात परतला कि त्यांची जंगी मिरवणूक काढून त्याचे स्वागत करण्यात येते. मात्र प्रत्येकवेळी मिरवणूकीत जवानचं असू शकतो असे बोलता येण कठीण आहे, कारण या घटनेत सैन्य प्रशिक्षणातून परतलेल्या सुनबाईची (Daughter In Law) जंगी मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणूकीची व सुनबाईची एकच चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

सिल्लोड (Sillod District) तालुक्याच्या कायगाव या (Kaygaon) गावची सुनबाई पूजा खरात (Daughter In Law) नुकतीच पंजाबमधून बीएसएफ सुरक्षा दलात सुमारे वर्षभराचे प्रशिक्षण घेऊन परतली होती. गावात येताच ग्रामस्थांच्या व तिच्या घरच्यांच्या वतीने या सुनबाईची जंगी मिरवणूक काढत सत्कार करण्यात आला

पूजा ही कायगाव येथील सुनबाई (Daughter In Law) व पालखेड तालुका वैजापूर येथील लेक आहे. पूजा ही सीमा सुरक्षा दल प्रशिक्षण घेण्यासाठी ट्रेनिंग सेंटर खडका कॅम्प पंजाब येथे रुजू झाली होती. बारा महिन्याचे खडतर प्रशिक्षण घेऊन ती परत आल्यावर गावकऱ्यांनी गावातून मिरवणूक काढून या कायगावच्या सुनबाईचे थाटात स्वागत केले. गावातून ही पहिली मुलगी सैन्यदलात भरती झाल्यामुळे पंचक्रोशीतून तिचे कौतुक केले जात आहे. या तिच्या यशाने सासरकडील मंडळी हि आनंदित झाली असून त्यांची मान अभिमानाने उंचावली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com