बाप रे तब्बल 1000 महिलांचा एकाच वेळी नृत्य सोहळा

बाप रे तब्बल 1000 महिलांचा एकाच वेळी नृत्य सोहळा

दोंडाईचा शहरात नटराज डान्स अकॅडमी च्या वतीने जवळपास एक हजार महिलांनी महाराष्ट्राची लोककला असलेल्या लावणी गोंधळ आणि जोगवा या गाण्यांवर फिरकत एकाच वेळी तब्बल 25 मिनिट न थांबता नृत्याचा विश्वविक्रम केला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

दोंडाईचा शहरात नटराज डान्स अकॅडमी च्या वतीने जवळपास एक हजार महिलांनी महाराष्ट्राची लोककला असलेल्या लावणी गोंधळ आणि जोगवा या गाण्यांवर फिरकत एकाच वेळी तब्बल 25 मिनिट न थांबता नृत्याचा विश्वविक्रम केला आहे. दोंडाईचा शहरांमध्ये नटराज डान्स अकॅडमी चे संचालक विक्की बाटुंगे यांच्या वतीने महिलांसाठी महानृत्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं.

या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी या सर्व 1000 महिलांनी विविध लावणी जोगवा आणि गोंधळ च्या गाण्यांवर तब्बल 25 मिनिटे न थांबता नृत्य केले. यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे तसेच कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या मान्यवरांचे ही मन भारावले. एकीकडे महाराष्ट्राची ही लोककला लोक पावत असताना विक्की बाटुंगे यांच्या माध्यमातून एवढा मोठा नृत्याचा आविष्कार दोंडाईचा शहरात आयोजित करण्यात आला होता.

यानंतर या या नृत्य सोहळ्याला गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या मॅगझिन मध्ये देखील स्थान मिळाले असून याबद्दल नटराज डान्स अकॅडमी देखील कौतुक करण्यात आलं. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी तसेच या नृत्यासाठी या 1000 महिलांनी तब्बल वर्षभरापासून सराव सुरू केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com