Dada Bhuse : नुकसान झालेल्या भागांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना
मनमाड, मालेगाव, चांदवडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागाला अवकाळी पाऊस आणि गारपीटचा बसला मोठा तडाखा बसला. अनेक भागात मुसळधार अवकाळी पावसासोबत जबरदस्त गारपीटने झोडपून काढले. शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजा नुसार मनमाड,चांदवड,नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली असून गारपीट इतक्या मोठ्या प्रमाणात झाली आहे कि काही भागात अक्षरशः सफेद चादर पसरून काश्मीर सारखे चित्र दिसत होते.
तुफान गारपीटमुळे शेतात गारांचा खच पडला त्यामुळे कांदा,गहू,यासह रब्बीच्या इतर पीका सोबत द्राक्षे, डाळिंब आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले तर वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्माळून पडली, विजेचे खांब कोसळले तसेच अनेक घरांची छाप्पर उडून गेली आहे. शेतात पाणीच पाणी झाल्यामुळे पिका सोबत काही ठिकाणी पोल्ट्री फार्मचे नुकसान होऊन कोंबड्याचा मृत्यू झाला आहे.
गेल्या वर्षी अतिवृष्टी त्यानंतर दुष्काळ आणि आता अवकाळी सोबत गारपीट सलग आणि वारंवार येत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून तातडीने पंचनामे करून नुकसान भरापाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे ज्या भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झाले आहे त्या त्या भागात तातडीने पंचनामे करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.