दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरणात आणखी किती काळ तपास सुरू राहणार? हायकोर्टाचे ताशेरे

दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरणात आणखी किती काळ तपास सुरू राहणार? हायकोर्टाचे ताशेरे

Published by :
Published on

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्ये प्रकरणी सुरु असलेल्या तपासावर मुंबई हायकोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच तपास सुरु असल्याचे दिसले नाही तर जबाबदार अधिकाऱ्यांपैकी कोणालाही सोडणार नाही,' असा थेट इशाराच दिला.

तिथे कर्नाटक राज्यात नंतर झालेल्या विचारवंतांच्या हत्यांच्या घटनांप्रकरणी खटलाही सुरू असेल तर इथे आपल्या राज्यात अजून खटले सुरू का झाले नाहीत?, असा सवालच मुंबई हायकोर्टाने सीबीआय आणि एसआयटीला विचारला.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या घटनेला आठ वर्षे आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला सहा वर्षे झाली. असा आणखी किती काळ तुमचा तपास सुरू राहणार? आम्ही दोन्ही तपास यंत्रणांच्या कामाविषयी शंका घेत नाही पण प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू असल्याचे दिसले पाहिजे, अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांपैकी कोणालाही सोडणार नाही,' असा स्पष्ट इशारा यावेळी मुंबई हायकोर्टाने सीबीआय आणि एसआयटीला दिला.

'अशाने लोकांच्या विश्वासाला तडा जातो. तसेच अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची खबरदारी घेणेही आवश्यक आहे', असे आपले निरीक्षणही आज न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने नोंदवले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com