आजपासून जमावबंदी

आजपासून जमावबंदी

Published by :
Published on

कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात आज, रविवारी मध्यरात्रीपासून १५ एप्रिलपर्यंत सर्वत्र रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्याने कडक निर्बंध लागू करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते.

रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत एकत्र येण्यास बंदी आहे. उपाहारगृहे, मॉल्स, चित्रपटगृहे, सागरी किनारे, बगीचे, उद्याने रात्री ८ वाजताच बंद करण्यात येतील. मुंबईसह महानगर प्रदेश तसेच पुणे महानगर प्रदेश, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेडमध्ये पुन्हा एकदा टाळेबंदी करण्याची मागणी स्थानिक प्रशासनाकडून होत आहे.

सरसकट टाळेबंदी लागू के ली जाणार नसली तरी काही निर्बंघ नव्याने लागू करण्यात आले आहेत. पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. दंडाची रक्कमही वाढवण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com