पुण्यात प्रियकरासह मित्राला मारहाण… दोघांचा मृत्यू!

पुण्यात प्रियकरासह मित्राला मारहाण… दोघांचा मृत्यू!

Published on

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात करंजविहिरे या ठिकाणी धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका २१ वर्षीय तरुणीला प्रियकराने पळवून नेले. यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी जोडप्याला एका हॉटेलच्या जवळ बोलावून घेतले. यानंतर मुलीकडच्या कुटुंबीयांनी प्रियकराला बेदम मारहाण केली. यात प्रियकरासह त्याच्या मित्राचा मृत्यू झाला आहे. यानंतर प्रेयसीच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे जिल्ह्यातील करंजविहिरे येथील हॉटेल माणुसकीच्या समोर हॉटेल मालक बाळू मरगज यांची वीटभट्टी आहे. वीटभट्टीवर काम करणारे कामगार बाळू सिताराम गावडे व राहुल दत्तात्रय गावडे यांनी हॉटेल मालक यांच्या २१ वर्षीय मुलीला पळवून नेल्याचा आरोप होत आहे. या तिघांचा नातेवाईकांनी शोध घेऊन त्यांना हॉटेल माणुसकी या ठिकाणी आणले. यानंतर त्यांना लाकडी काठी, लोखंडी रॉड यांच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत बाळू व राहुल या दोघांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी त्या ठिकाणाहून पळ काढला.

मात्र पोलिसांनी अनिल संभाजी कडाळे,राजू साहेबराव गावडे,किरण बाळू मेंगाळ, चंद्र करा उर्फ मुक्ता बाळू गावडे,आनंदा सीताराम जाधव,मुलीचे वडील व हॉटेल मालक बाळू मरगज यांना अटक केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com