आरोग्यमंत्र्यांच्या घरासमोर मारला कलर स्प्रे; भाजपाच्या 13 कार्यकर्त्यांवर गुन्हा

आरोग्यमंत्र्यांच्या घरासमोर मारला कलर स्प्रे; भाजपाच्या 13 कार्यकर्त्यांवर गुन्हा

Published by :
Published on

रवि जयस्वाल, जालना | आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या घरासमोर कलर स्प्रे केल्याची घटना घडली होती. यार प्रकरणी आता भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध जालन्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानाबाहेर भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कलर स्प्रे पेंटींग केली होती. त्यामुळे कलर स्प्रे पेंटींग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.जमावबंदीचा आदेश जुगारून आणि कोरोना महामारीच्या नियमांचे पालन करावे यासाठी लावण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायदायचे उल्लंघन तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या विरुद्ध सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर व्हायरल केल्याप्रकरणी भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश महामंत्री राहूल लोणीकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांच्यासह 13 कार्यकर्त्यांविरुद्ध जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com