महाराष्ट्र
भारतात आतापर्यंत ४० कोटी लोकांना लस, केंद्राने जारी केली आकडेवारी
कोरोनाला रोखण्यासाठी भारतात जगातील सर्वात मोठे लसीकरणाचे अभियान राबवण्यात आले. याअंतर्गत आतापर्यंत देशभरात ४० कोटी ४४ लाख नागरिकांचे लसीकरण पार पडले आहे.
केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शनिवारी 7 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 40 कोटी 44 लाख 67 हजार 526 जणांनी लस घेतली. शनिवारी दिवसभरात 46 लाख 38 हजार 106 जणांना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती. आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 1 कोटी 2 लाख 68 हजार 882 इतकी आहे तर 75 लाख 38 हजार 877 जणांना दोन्ही डोस घेतले आहेत. फ्रंट लाइन वर्कर्समध्ये 1 कोटी 77 लाख 91 हजार 635 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस 1 कोटी 3 लाख 41 हजार 848 जणांनी घेतला आहे.