महाराष्ट्र
Covid 19 : राज्यात 807 नवीन रूग्णांचं निदान, 20 मृत्यूंची नोंद
मुंबई | महाराष्ट्रात आज दिवसभरात 807 नवीन कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. तर 20 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 869 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आजपर्यंत एकूण 64 लाख 91 हजार 805 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यातील रूग्ण बरे होण्याचं प्रमाण 97. 72 टक्के इतकं झालं आहे.
महाराष्ट्रात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 67 लाख 59 हजार 668 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 43 हजार 179 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 75 हजार 95 व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत तर 865 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.