महाराष्ट्र
रुग्णवाहिकेतून देशी दारूची वाहतूक… संगमनेरमध्ये दोघे अटकेत
राज्यभरात कोरोग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असताना रुग्णवाहिकेतून देशी दारूची वाहतूक सुरू असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संगमनेर शहर पोलिसांनी या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतलं असून दारूचे सात बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत दोन लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरात नाकाबंदी सुरू असताना ही कारवाई झाली आहे. रुग्णवाहिकेत रुग्ण नसताना देखील सायरन सुरू ठेऊन गाडी चालवत असल्याने पोलिसांनी चौकशी केली.
या चौकशीदरम्यान रुग्णवाहिकेत देशी दारूचे सात बॉक्स आढळून आले. संगमनेर शहर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. दोन लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.