सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीची आज मतमोजणी
Sindhudurg District Central Co-operative Bank Election: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची काल निवडणूक पार पडली. निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) पॅनल आणि महाविकास आघाडीत मोठी चुरस पाहायला मिळाली. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी होणार.
19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात होते. दरम्यान, शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत कणकवलीत मतदानाचा हक्क बजावला.
2008 पासून बँक राणे यांच्या अधिपत्याखाली होती. मात्र, 2017मध्ये जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत यांनी राणे यांच्यापासून वेगळेपण घेत शिवसेनेत गेले. त्यानंतर बँक शिवसेनेच्या ताब्यात दोन वर्ष राहिली. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप महाविकास आघाडीला धक्का देणार की महाविकास आघाडीचे पॅनेल पुन्हा सत्ता ताब्यात ठेवणार याकडे लक्ष लागले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहेतर महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख आणि विद्यमान चेअरमन सतीश सावंत यांचीही प्रतिष्ठा लागली आहे.