Covid-19 Vaccination : 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत महत्वाची बातमी!

Covid-19 Vaccination : 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत महत्वाची बातमी!

Published by :
Published on

मुंबई | देशभरातील पालकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण आता 12-14 वयोगटातील किशोरवयीन मुलांचे कोविड लसीकरण चक्क पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होणार आहे, अशी माहिती डॉ. एन.के.अरोरा यांनी दिली आहे. डॉ. अरोरा हे लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या कोविड -19 कार्यगटाचे अध्यक्ष आहेत. आता त्यांनीच हिरवा कंदील दाखवल्यामुळे हे लसीकरण सुरू होण्याचा मोठा मार्ग मोकळा झाला आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाणे सध्या देशभरात 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू आहे. देशभरात सुरुवातीच्या 6 दिवसात 1.5 कोटी पेक्षा अधिक मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे. मात्र, त्यापेक्षा लहान मुलांचे लसीकरण कधी सुरू होणार याची उत्सुकता होती.

डॉ.अरोरा नेमकं काय म्हणाले? :

  • आम्ही 15-17 वयोगटातील सर्व 7.4 कोटी किशोरवयीन मुलांना जानेवारीच्या अखेरीस पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आम्ही त्यांना फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून दुसऱ्या डोससह लसीकरण सुरू करू शकू आणि फेब्रुवारीच्या अखेरीस दुसरा डोस पूर्ण करू शकू.
  • त्यानंतर 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीपासून लसीकरण सुरू होऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com