Corona Vaccination : महाराष्ट्रात ११ कोटी नागरिक बनले बाहुबली
कोरोनाचा संसर्ग खालावला असताना राज्यात आज ११ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. याबद्दलची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून दिली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पोस्ट केलं "महाराष्ट्रात ११ कोटी नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा टप्पा गाठण्यात आज यश आले. या यशाबद्दल महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे आणि लसीकरणाच्या कामात व्यस्त असणाऱ्या सर्वांचे अभिनंदन." असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट केले आहे.
"राज्यात नऊ नोव्हेंबर रोजी १० कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. तेंव्हापासून राज्यात एक कोटींवर नागरिकांना लस देण्याचे काम झाले आहे. यामध्ये आरोग्य विभागाच्या सर्व स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानतो." असं ट्विट करून राजेश टोपे यांनी आभार मानले.
त्यानंतर "राज्यातील ३.७६ कोटी नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आल्या आहेत. ७.२४ कोटी नागरिकांना एक मात्रा देण्यात आली आहे. लवकरच राज्यातील सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत." अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या सोशल मिडिआ द्वारे माहिती दिली आहे.