संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील मानकऱ्यांची कोरोना तपासणी

संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील मानकऱ्यांची कोरोना तपासणी

Published by :
Published on

सुरेश वायभट, प्रतिनिधी

पंढरपूर येथील २० जुलै रोजी होणाऱ्या आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्य शासनाने कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत दहा संताच्या पालखी सोहळ्याला सहभागी होण्याची परवानगी दिली आहे.

या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पैठण येथील संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील 40 मानकऱ्यांची आज नाथमंदिराच्या किर्तन हॉलमध्ये तहसीलदार चंद्रकांत शेळके व पालखी सोहळ्याचे प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.

शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सीमा साळवे, डॉ पंडित किल्लारीकर, बालाजी शहाणे, मोहिनी कुटेकर, चांडाळे यांनी पंढरपूर सोहळ्यात जाणाऱ्या मानकऱ्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली.

यावेळी श्रीकृष्ण कुलकर्णी, सचिन पांडव, रेखाताई कुलकर्णी, प्रसाद सेवनकर, व्यवस्थापक चंद्रकांत अंबिलवादे, ऋषिकेश महाराज नवले, शेषनारायण महाराज काकडे, चंद्रकांत महाराज खेडकर आदी उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com