चिंताजनक! लसीकरण होऊनही 'इतक्या' टक्के रुग्णांना कोरोना
मुंबई : कोरोना रुग्णांची (corona Patient) संख्या सध्या वाढत असून राज्याच्या चिंतेचा विषय ठरला आहे. अशातच आणखी एक चिंताजनक विषय समोर आला आहे. लसीकरण (Vaccination) होऊनही ६८ टक्के रुग्णांना पुन्हा कोरोना (Corona virus) होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
कोविडच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शहरात पुन्हा मास्क करण्याबाबत अनिवार्य सुरू अ स ले ल्याच दरम्यान पालिकेच्या मरोळमधील एकमेव सेव्हन हिल्स समर्पित कोविड रुग्णालयातील आकडेवारीवरून नव्या बाधितांमध्ये ६८ टक्के दोन्ही डोस घेतलेले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यातील ५० टक्के रुग्ण ४५ वर्षांपेक्षा कमी वयाचे असून त्यांच्यात सौम्य लक्षणे आहेत. त्यांची सर्वाधिक बाहेर ये-जा सुरू असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी सध्या मास्क वापरण्याची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. कारण संक्रमित तरुणांचा गट स्प्रेडरमध्ये बदल होऊ शकतो.
सेव्हन हिल्स रुग्णालयात शुक्रवारपर्यंत उपचार घेत असलेले ६४ पैकी ३२ रुग्ण ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. २६ रुग्ण १८ ते ४५ वर्षे वयोगटातील आहेत. आणखी सहा रुग्ण आठ वर्षांखालील आहेत. तरुणांमध्ये रोगप्रतिकारशक्ती जास्त असते. त्यांना सौम्य असतो. मात्र, संसर्ग त्यांच्यापासून त्यांच्या घरातील वृद्ध नागरिक संक्रमित होण्याचा धोका आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढती कोरोना आकडेवारी लक्षात घेता टास्क फोर्सची बैठक घेतली होती. जर रुग्णसंख्या अशीच वाढली तर पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले दिली. यासोबतच कोविड रुग्णालये तयार ठेवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.