कोरोना वाढल्याने राज्यात पुन्हा मास्क सक्ती लागू
राज्यात कोरोनाची आकडेवारीत (Coorona Update) वाढत झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपुर्वी टास्क फोर्सची बैठक घेतली होती. त्यानंतर आता राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क सक्ती लागू करण्यात आली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मास्क सक्तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने (Covid19)उचल खाल्ली आहे. राज्याप्रमाणे देशात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या सगळ्यांसाठीच डोकेदुखीचा विषय ठरला आहे. केंद्र सरकार याबाबत (Center government)सतर्क झाले आहे. देशातील पाच राज्यांत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे.
मास्क सक्ती रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृहात लागू गेली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने पत्र काढले असून ते लोकशाहीला मिळाले आहे.
जुलै महिन्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात मोठी रुग्णवाढ होण्याची शक्यता आयआयटी कानपूरमधील तज्ज्ञांनी व्यक्त केली. यापुर्वी त्यांनी व्यक्त केलेले अंदाज खरे ठरले होते
कुठे असणार मास्क सक्ती
मास्क सक्ती रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, रुग्णालय, कॉलेज, शाळा
कोणत्या राज्यात कोरोना वाढला
महाराष्ट्रासह. तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांत कोरोना रुग्ण वाढत आहे. या राज्यात एका हजारांहून अधिक रुग्णसंख्या समोर येत आहे. यामुळे केंद्रीय आयोग्य सचिवांनी राज्याच्या आरोग्य खात्याच्या सचिवांना पत्र पाठवले आहे. कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रणाची उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात सहा जिल्ह्यांमध्ये (six district in state)गंभीर परिस्थिती असल्याचे केंद्राने नमूद केले आहे.
राज्यात या जिल्ह्यात रुग्णवाढ
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर
गेल्या महिनाभरात कोरोनाची रुग्णसंख्या सात पटीने वाढली आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे, गुरुवारी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही टास्क फोर्सची बैठक घेत राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला आहे. मास्क वापरण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले असून, परिस्थितीत बदल झाला नाही तर येत्या १५ दिवसांत कठोपर निर्णय घेणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.