मोदींच्या देहू दौऱ्याला वादाचे ग्रहण; आता पगडीवर आक्षेप
Team Lokshahi

मोदींच्या देहू दौऱ्याला वादाचे ग्रहण; आता पगडीवर आक्षेप

PM Narendra Modi यांना देण्यात येणाऱ्या तुकाराम पगडीवरील ओवी अचानक बदलल्या
Published on

अमोल धर्माधिकारी | पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे उद्या संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांच्या देहूत येणार आहेत. यावेळी ही भेट विशेष बनविण्यासाठी देवस्थान संस्थेतर्फे मोदींसाठी डिझायनर तुकाराम पगड्या तयार करण्यात आल्या आहेत. परंतु, त्यापूर्वीच ही आता पगडी चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे पगडीवरच्या ओवी.

मोदींच्या देहू दौऱ्याला वादाचे ग्रहण; आता पगडीवर आक्षेप
Nana Patole : कॉंग्रेसला बदनाम करण्याचा भाजपचा धंदा

नरेंद्र मोदी हे उद्या संत तुकाराम महाराज यांच्या देहूत दाखल होत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते जगतगुरु संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यानिमित्त ही भेट विशेष बनविण्यासाठी देवस्थान संस्थेतर्फे मोदींसाठी डिझायनर तुकाराम पगड्या आणि उपरणे तयार करण्यात येत आहे. देहू संस्थांन विश्वस्तांच्या विनंतीनुसार पुण्यातील सुप्रसिद्ध मुरूडकर झेंडेवाले यांच्या कला वर्कशॉपमध्ये या पगड्या तयार केल्या जात आहे. या पगड्यांवर पारंपरिक पद्धतीने हस्तलिखित गाथा कारागिरांनी लिहिली असून या माध्यमातून संपूर्ण जगात तुकोबांचे विचार पोहचवण्याचा मानस असल्याची माहिती दिली जात आहे. परंतु, नेमक्या याच ओवीवरून आता वाद निर्माण झाला आहे.

मोदींच्या देहू दौऱ्याला वादाचे ग्रहण; आता पगडीवर आक्षेप
काय सांगता! पुण्यात वाहतूक पोलीस दंड आकारणार नाहीत

सुरुवातीला या पगडीवर 'भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी' या ओळी होत्या. परंतु, यावर काहींनी आक्षेप घेतल्यानंतर आता देहू संस्थानाने ओवी बदलल्या आहेत. आता या पगडीवर 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ' अशा ओळी टाकण्यात आल्या आहेत.

या आधी देखील पुण्यात मेट्रो उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधानांना महापालिकेकडून देण्यात आलेल्या फेट्यावर शिवमुद्रा होती. मात्र, त्याला आक्षेप घेतला गेल्याने तीही काढण्यात आली होती. आणि आता दुसऱ्यांदा पगडीवरील ओळी बदलण्यात आल्याचा समोर येत आहे.

मोदींच्या देहू दौऱ्याला वादाचे ग्रहण; आता पगडीवर आक्षेप
Nilesh Rane : आज पेंग्विनचा वाढदिवस तर उद्या सुशांतचा मृत्यूदिन

दरम्यान, पंतप्रधान मोदींचा दौरा याआधीही अनेक वेळा वादात आला आहे. मोदींच्या दौऱ्यानिमित्त संत तुकाराम महाराजांचे मंदिर उद्यापासून दर्शनासाठी बंद ठेवले जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. याविरोधात प्रतिक्रिया आल्याने देहू मंदिर तीन दिवस नाही तर या फक्त १४ तारखेला दर्शनासाठी बंद राहणार असल्याचे स्पष्टीकरण देहू संस्थानने दिले आहे. तर मोंदीच्या दौऱ्यानिमित्त पोस्टर्सवरुनही वाद निर्माण झाला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com