महाराष्ट्र
वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी दिव्यांग प्रमाणपत्र देणारे डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात
वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात आता मोठी माहिती समोर येत आहे.
सुशांत डुंबरे, पिंपरी चिंचवड
वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात आता मोठी माहिती समोर येत आहे. दिव्यांग प्रमाणपत्र देणारे डॉक्टर चौकशीच्या फैऱ्यात सापडले आहेत. पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून डॉक्टरांच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने वायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांसह पूजाला मदत करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता पूजा खेडकरला मदत करणाऱ्या सर्व डॉक्टरांची चौकशी होणार आहे.
चौकशीत दोषी आढळल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर, तसेच मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा. यासोबतच चौकशीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा. असा आदेश देण्यात आला आहे.