महाराष्ट्र
नागरिक ऑफिसला कसे जाणार?, संजय निरूपम यांचा ठाकरे सरकारला सवाल
दुसऱ्या लाटेचा जोर कमी होत असताना राज्यात कोरोनाचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल करण्यासाठी राज्य सरकारने पाच गटात विभागणी केली असून, मुंबई ही तिसऱ्या गटात मोडत आहे, लोकल बंद असल्याने नागरिक ऑफिसला कसे जाणार? असा सवाल काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी ठाकरे सरकारला केला आहे.
संजय निरुमप यांनी ट्वीट करून ठाकरे सरकारला प्रश्न विचारला आहे. मुंबईमध्ये लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. पण, याचा लोकांना त्रासच जास्त होणार आहे. कार्यालये उघडली जात आहेत, पण सार्वजनिक वाहतूकच नाही. एकतर बसेसची संख्या वाढविण्यात यावी किंवा नियंत्रित प्रमाणात लोकल सुरू करण्यात यावी. नाहीतर लोक ऑफिसला कसे जाणार? वर्क फ्रॉम ऑफिसलाही एक मर्यादा आहे, असं म्हणत निरुमप यांनी ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाला सुनावलं आहे.