पन्नाशीतल्या सतेज पाटील, विश्वजित कदमांना काँग्रेस राज्यमंत्री पदीचं कसं काय ठेवतंय ? अजित पवारांची खंत
सुशांत डुंबरे | पन्नाशी गाठलेले सतेज पाटील, विश्वजित कदम यांना काँग्रेस राज्यमंत्री पदीच कसं काय ठेवतंय? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थित करत खंत व्यक्त केली. पिंपरी चिंचवडमध्ये डी वाय पाटील ज्ञानपीठ शाळेच्या उद्घाटनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.
अजित पवारांनी सतेज पाटलांना त्यांचं वय विचारलं तेंव्हा मी पन्नाशीत पोहचल्याच त्यांनी सांगितलं. हा संदर्भ देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आम्ही अडतीस ते चाळीस वयाचे असताना, आम्हाला कॅबिनेट मंत्री पद दिलं. पण सतेज पाटील, विश्वजित कदम हे पन्नाशीत गेले तरी त्यांना कॉंग्रेस राज्यमंत्री पदी ठेवतंय. अशी खंत व्यक्त केली.
पुढे अजित पवार म्हणाले, मुळात तरुणपणी कॅबिनेट पद दिलं तर त्यांचं एक वेगळं व्हिजन राज्याच्या कामी येतं. पण राज्यमंत्री पदी असताना ते व्हिजन तडीस नेहता येत नाही. कारण राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री यांच्या अधिकारात जमीन-अस्मानचा फरक असतो, असा दाखला ही अजित पवारांनी यावेळी दिला.