कंगणा रणौत विरोधात काँग्रेस आक्रमक; कायदेशीर कारवाई करणार

कंगणा रणौत विरोधात काँग्रेस आक्रमक; कायदेशीर कारवाई करणार

Published by :
Published on

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही, असा दावा कंगनाने केला आहे. कंगनाच्या या विधानावर विविध प्रतिक्रिया उमटत असताना, काँग्रेसने तिच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

कंगनाने महात्मा गांधी यांच्याबाबत विधान केलं आहे. महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही. असा दावा कंगनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर केला काँग्रेस कंगनाच्या या वक्तव्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल करणार आहे. दरम्यान "महात्मा गांधींबद्दल कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याबद्दल महाराष्ट्र काँग्रेस अभिनेत्री कंगना रणौतवर कायदेशीर कारवाई करणार आहे. काँग्रेस तिच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे अधिकृत तक्रार नोंदवेल.", असं महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

या विरोधात कायदेशीर कारवाईबाबत आम्ही विचार करत आहोत, आम्ही आमच्या कायदेशीर सल्लागार सेलशी देखील याबाबत चर्चा केली आहे. आम्ही पोलिसात देखील तक्रार दाखल करणार आहोत, असे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com