महाराष्ट्र
पती नपुसंक असल्याची पोलिसांत तक्रार
हिंगोलीत एका महिलेने आपला पती नपुसंक असून याबाबत त्याच्या आई वडील आणि इतर नातेवाईकांना माहिती असूनही, त्यांनी माझ्याशी लग्न लावून माझी फसवणूक केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे.
तक्रारदार महिलेचा विवाह 2015 साली झाला होता, विवाहानंतर नवऱ्याकडून शरीर सुखाची मागणी केल्यानंतर तो नपुसंक असल्याची माहिती महिलेने दिली. या संदर्भात कोणालाही सांगितल्यास मारहाण करण्याची धमकी दिली आहे.तसेच माहेरकडून पैसे आणण्यास नकार दिला तरही मारहानीची धमकी देण्यात आल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान आता याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे.