Chhagan Bhujbal | पंचनामे पूर्ण करून लवकरात लवकर भरपाई देणार; पालकमंत्र्यांचे आदेश
संदीप जेजूरकर, लासलगाव ( नाशिक ) | मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. नुकसानग्रस्त भागांचा मंत्र्यांकडून पाहणी दौरा सूरू आहे. आज नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी पंचनामे पूर्ण करत लवकरात लवकर भरपाई देणार असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.
येवला, लासलगाव भागात अतिवृष्टीमुळे शेती सोबत घरांचे मोठे नुकसान झाले आहेत. त्यामुळे या भागात पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज पाहणी केली. राज्यात सर्वच ठिकाणी एकाच निकषावर पूरग्रस्तांना समसमान मदत करण्याचा शासनाचा प्रयत्न असून कुणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून पूरग्रस्तांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.येवला – लासलगाव भागात शेतीचे मोठे नुकसान झाले असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून पंचनामे पूर्ण होताच लवकरात लवकर भरपाई देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.