कुणी बस देता का बस? कॉलेज युवतीच बससाठी पाचव्यांदा आंदोलन

कुणी बस देता का बस? कॉलेज युवतीच बससाठी पाचव्यांदा आंदोलन

जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मणेराजूरीत महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी रस्त्यावर बसून आज ठिय्या आंदोलन केले.
Published by :
shweta walge
Published on

सांगली; जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मणेराजूरीत महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी रस्त्यावर बसून आज ठिय्या आंदोलन केले. ज्यादा बस सोडत नसल्याच्या कारणावरून हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व ग्रामस्थांनी पाठिंबा दिला.

गेल्या तीन महिन्यात पाचव्यांदा आंदोलन करण्याची वेळ शाळकरी विदयार्थीनीवर आली आहे. मणेराजूरीमधून तासगावकडे जाणेसाठी बसच नसल्याने मणेराजूरी बस थांब्यासमोर हे आंदोलन करणेत आले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे तासगांव -कवठेमहांकाळ राज्यमार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली. यामुळे वाहतुकीची प्रचंड मोठी कोंडी झाली. मणेराजूरीत महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी रस्त्यावर बसून आज ठिय्या आंदोलन केले.ज्यादा बस सोडत नसल्याच्या कारणावरून हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. गेल्या तीन महिन्यात पाचव्यांदा आंदोलन करण्याची वेळ शाळकरी विदयार्थीनीच्यावर आली आहे. मणेराजूरीमधून तासगावकडे जाणेसाठी बसच नसल्याने मणेराजूरी बस थांब्यासमोर हे आंदोलन करणेत आले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे तासगांव -कवठेमहांकाळ राज्यमार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली. यामुळे वाहतुकीची प्रचंड मोठी कोंडी झाली. मणेराजुरीसह परिसरातील कॉलेज युवतींनी बससाठी हे पाचव्यांदा आंदोलन केले असून, कोणी बस देता का? असे म्हणण्याची वेळ कॉलेज विदयार्थिनीवर आली आहे.

अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींचे वेळेत कॉलेजला न गेल्यामुळे मोठे नुकसान होत आहे. गरीब घरच्या मुलांनी शिकायचे नाही का !शासनाचा पास असलेली बस असल्यामुळे विदयार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली खरी पण, एसटीच नसल्यामुळे शिकायचे का नाही ? हा मोठा प्रश्न हा आवासून उभा आहे. यावर काही तोडगा निघणार का ? अशी संतप्त प्रतीक्रिया उमटत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com