राज्यात थंडीचा पारा घसरणार – IMD
राज्यात एकीकडे धुळीचे वादळ भोंगावत आहे तर राज्यातील अनेक भागात तापमानात देखील मोठी घट झाली. त्याचप्रमाणे गेल्या 24 तासात राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस देखील कोसळला त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. राज्यावर सध्या अवकाळी पाऊस, थंडी आणि धुळीच्या वादळाचे सावट पहायला मिळत आहे.
दरम्यान मुंबई, ठाणे,पालघर आणि रायगड जिल्ह्यात धुळीचे वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्यात सुमारे 20-30 किमी वेगाने धुळीचे वारे वाहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राज्यातील थंडीचा पारा देखील चांगलाच घसरण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबादमध्ये थंडीचा पारा चांगलाच घसरला असून कमाल तापमान हे 25 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.
मुंबईत आज सोमवारी देखील सकाळी ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात धुक्याचे चित्र पहायला मिळत आहे. मुंबईत रविवारी हवेची गुणवत्ता पातळी चांगलीच खालवल्याचे पहायाला मिळाले. मुंबईतील एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक 180 इतका होता. मालाड आणि माझगाव भागात हा निर्देशांक 300 इतका नोंदवला गेला. मालाडमध्ये 316 एक्सूआय तर माझगावमध्ये 315 एक्यूआय होता.