CNG pump
CNG pump Team Lokshahi

पुण्यात आजपासून सीएनजी पंप राहणार बंद

पुणे जिल्ह्यातील सीएनजी पंपचालक आजपासून बेमुदत संपावर असणार
Published on

पुणे : पुणे जिल्ह्यातील सीएनजी पंपचालक आजपासून बेमुदत संपावर असणार आहे. पंपचालकांना टोरंटो कंपनीकडून कमिशन दिले जात नसल्याने याविरोधात जिल्ह्यातील सीएनजी पंप बंद राहणार आहेत. तर दुसरीकडे पुणे शहरातील एमएनजीएलचे सीएनजी पंप सुरू राहणार आहेत.

CNG pump
'तेव्हा तुझी गोधडीत झोपले' संजय गायकवाडांचे ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर

सीएनजी पंपचालकांनी हा बेमुदत संप सुधारित ट्रेड मार्जिनबद्द्ल एमओपीएनजीने जारी केलेल्या परिपत्रकाच्या संदर्भात आहे. एकीकडे पुणे जिल्ह्यात एमएनजीएल कंपनीने आणि प्रमुख सीजीडीने थकबाकीसह पैसे दिलेत किंवा ते देण्यास सहमती दर्शवली आहे. तर दुसरीकडे टोरंट गॅससह काही कंपन्यांनी पैसे देण्याबाबत वाद केल्यामुळे हा संप पुकारल्याचे पंपचालकांकाडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून शहरातील सीएनजी पंपावर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागात सीएनजी वाहनामधून होणारी वाहतूकही विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com