सहा आठवड्यात CNG-PNG तिसऱ्यांदा महागलं

सहा आठवड्यात CNG-PNG तिसऱ्यांदा महागलं

Published by :
Published on

महागाईचा भडका उडताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. आधीचं कोरोना संकटानं हैराण असलेल्या सर्वसामान्य जनतेला महागाईची झळ बसत आहे. त्यातच आता महानगर गॅसनं सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सहा आठवड्यात तिसऱ्यांदा वाढ झाली आहे.महानगर गॅसने मुंबईत सीएनजी प्रतिकिलो 3 रुपये 6 पैशांनी तर पीएनजी 2 रुपये 6 पैशांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून ही दरवाढ लागू होणार आहे .

नव्या दरानुसार मुंबईत एक किलो सीएनजीसाठी 61 रुपये 50 पैसे तर एक किलो पीएनजीसाठी 36 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत. गेल्या दोन महिन्यातील सीएनजी आणि पीएनजीमधली ही तिसरी दरवाढ आहे. दररोजच्या भाववाढीमुळे देशातील महागाईचा उच्चांक दिसून येत आहे. सर्वच वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरही 900 रुपयांच्या पुढे गेलाय.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नैसर्गिक वायूच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे एमजीएलच्या इनपुट गॅसच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. गॅसच्या इनपुट खर्चातील वाढ अंशतः भरून काढण्यासाठी सीएनजीच्या मूळ किमतीत वाढ केली जात आहे

सोलापुरात सीएनजीचे काय दर ?

राज्यभरात काही ठिकाणी रात्रीपासून सीएनजी आणि पीएनजी या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. सर्वत्र सीएनजी चे दर वेगवेगळे आहेत. सोलापुरातील सीएनजीचे दर ते 81 रुपयांवर पोहोचले आहेत.वाहतुकीचा अतिरिक्त खर्च असल्याने सीएनजी चे दर जास्त असल्याची माहिती पंप चालकांनी दिली. पेट्रोल आणि डिझेल पेक्षा हे दर कमी असल्याकारणाने सीएनजी परवडते अशी प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली. घाट सध्या सोलापुरात केवळ दोनच सीएनजी पंप सुरू असल्याने पेट्रोल पंपाच्या बाहेर लांबच लांब रांगा देखील पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com