मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला; विधान परिषदेच्या 12 आमदारांचा तिढा सुटणार?
विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रमुख नेते देखील उपस्थित आहेत. दरम्यान विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा सुटणार का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्र्यांसह महाविकासआघाडीचे प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा कित्येक महिन्यांपासून प्रलंबित आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा याचबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट होणार आहे. त्यामुळे, या भेटीतून तरी तोडगा निघणार का? याकडे सर्वांचं लक्ष असेल.८ महिने होऊनही अद्याप राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीवर काही निर्णय घेतला नाही. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंती राज्यपालांना भेटून केली जाणार आहे.