Cm Uddhav thackeray
Cm Uddhav thackerayTeam Lokshahi

80 वर्षांच्या आजीबाईंची मुख्यमंत्र्यांनी घेतली 'फायर' भेट!

शिवसेनेच्या आंदोलनावेळी ८० वर्षांची कट्टर शिवसैनिक चंद्रभागा शिंदे या आकर्षणाचा बिंदु ठरल्या होत्या.
Published by :
Published on

“झुकेगा नहीं साला” म्हणत राणा दाम्पत्याला इशारा देणाऱ्या मुंबईतील 80 वर्षीय 'फायर' आजी चंद्रभागा शिंदे यांची त्यांच्या राहत्या घरी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सहकुटुंब भेट घेतली. तसेच तुम्हीच आमच्या घरी यायचं का असं म्हटलं.

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या राणा दाम्पत्याने (Navneet Ravi Rana) मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर शिवसैनिकही आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी आक्रमक पावित्रा घेत मातोश्रीचा पहारा दिला होता. या शिवसेनेच्या आंदोलनावेळी एक ८० वर्षांची कट्टर शिवसैनिक चंद्रभागा शिंदे या आकर्षणाचा बिंदु ठरल्या होत्या. कारण भर उन्हात जिथे चालण शक्य नसताना तिथे कट्टर शिवसैनिक चंद्रभागा शिंदे या मातोश्रीबाहेर राणा दाम्पत्याविरोधात आंदोलन करत होत्या. त्यातच पुष्पा स्टाईलमध्ये मै झुकेगा नही साला म्हणत त्यांनी शिवसैनिक माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांचेहे आंदोलन चर्चेत आले होते.

मुख्यमंत्र्यांनी चंद्रभागा शिंदे या आजींची परळमधील दाभोळकर वाडीत त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. तसेच तुम्हीच आमच्या घरी यायचं का असं म्हटलं. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असताना मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमाला गैरहजर राहत आजींची भेट घेतली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com