मुख्यमंत्र्यांना उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूंच्या दुखापतीचा त्रास बळावला होता. त्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले होते. आता त्यांच्यावर 12 नोव्हेंबरला शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यानंतर आता उद्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे अशी माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूंच्या दुखापतीचा त्रास उद्भवला होता. त्यामुळे मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. गेल्या आठवड्यापासून मुख्यमंत्र्यांना मानदुखीचा त्रास जाणवू लागला होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर 12 नोव्हेंबरला त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.यानंतर तीन दिवस त्यांनी रुग्णालयातच विश्रांती घेतली आहे. आता ते घरी जाऊन आराम करू शकतात, असे डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टरांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना आठवडाभर विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.