मुख्यमंत्री कोरोना काळात पैसे मोजत होते, किरीट सोमय्यांची टीका

मुख्यमंत्री कोरोना काळात पैसे मोजत होते, किरीट सोमय्यांची टीका

Published by :
Published on

संदीप शुक्ला, बुलढाणा | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाकाळात काम नव्हे तर खाली मान करून पैसे मोजत होते, स्वतःच्या बायकोचे 19 बेकायदेशीर बंगले वाचवण्यात व्यस्त होते असा निशाना किरीट सोमय्या यांनी साधला आहे.

कोरोनाच्या संपूर्ण काळात आपल्याला वर मान करायलाही वेळ मिळाला नाही एवढे काम होते, आणि त्यामुळेच मानेचा त्रास सुरू झाला असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना किरीट सोमय्या बोलत होते.उद्धव ठाकरे हे काम करण्यात नव्हे तर कोरोनाकाळात पैसे मोजण्यात व्यस्त होते, स्वतःच्या बायकोचे 19 बेकायदेशीर असलेले बंगले वाचवण्यात व्यस्त होते, असा टोला सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com