महाराष्ट्र
वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत खासगी योजनेला मान्यता;यासह मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. वैद्यकीय महाविद्यालये आणि आदर्श शाळांच्या बांधाकामांबाबत या बैठकीत एक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत खासगी योजनेला मान्यता देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळ बैठकीत कोणकोणते महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत ते जाणून घेऊया.
महत्वाचे निर्णय
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय स्थापनेसाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरण निश्चित (वैद्यकीय शिक्षण विभाग)
- भारतरत्न राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त राजीव गांधी आविष्कार नगरी उभारण्याचा निर्णय (शालेय शिक्षण विभाग)
- आदर्श शाळा बांधकामाबाबत निर्णय (शालेय शिक्षण विभाग)
- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त राज्यात विविध कार्यक्रमांच्या आयोजनाचा निर्णय (सांस्कृतिक कार्य विभाग)
- आयपीसीसी या संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेने वातावरणीय बदलांच्या अनुषंगाने ऑगस्ट २०२१ मध्ये सादर केलेल्या अहवालाचे सादरीकरण (पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग)