मुंबईत नाईट लॉकडाऊन ?; मुख्यमंत्र्यांनी बोलावली टास्क फोर्सची बैठक

मुंबईत नाईट लॉकडाऊन ?; मुख्यमंत्र्यांनी बोलावली टास्क फोर्सची बैठक

Published by :
Published on

राज्यात ओमायक्रॉनचे रूग्ण वाढत चालले आहेत, त्याचबरोबर कोरोना रूग्णांमध्येही वाढ झाली आहे. या सर्व पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

राज्यात आज २३ ओमायक्रॉनबाधित आढळले असून ओमायक्रॉनबाधितांची एकूण संख्या ८८ झाली आहे. तर दिवसभरात १ हजार १७९ नवीन कोरोनाबाधितांची देखील नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता व नवीन वर्षानिमित्त नागरीक जमून संसर्ग वाढण्याची भीती पाहता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री १० वाजता टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. या बैठकीत नाईट लॉकडाऊन लागण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या पार्श्वभुमिवर बैठक बोलावल्याने काय निर्णय घेण्यात येतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com