एकनाथ शिंदेंकडून पावसाच्या स्थितीचा आढावा; दिले महत्वाचे निर्देश

एकनाथ शिंदेंकडून पावसाच्या स्थितीचा आढावा; दिले महत्वाचे निर्देश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आणि महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत.
Published on

मुंबई : राज्यासह मुंबईत पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे मुंबईतील तीनही रेल्वे मार्गावरील सेवा ठप्प झाली होती. चाकरमान्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावं लागत होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आणि महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांचे हाल होणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

एकनाथ शिंदेंकडून पावसाच्या स्थितीचा आढावा; दिले महत्वाचे निर्देश
लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! तिन्हीही मार्गांवर काय स्थिती?

एकनाथ शिंदे म्हणाले की, कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांचे हाल होणार नाही. नागरिकांनी हवामान सूचनांचे पालन करावे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनांचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन व्यवस्थापन अलर्ट आहेत. आवश्यकतेनुसार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. एनडीआरएफला ज्या ठिकाणी आवश्यक आणि आहे तेथे तैनात करण्यात आले आहे.

तसेच, लोकल उशिराने धावत असल्याने सर्व रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकाच्या बाहेर एसटी आणि बसेस सोडण्याचे एकनाथ शिंदेंनी आदेश दिले आहेत. सीएमएसटी, भायखळा दादार, घाटकोपर ठाणे स्थानकाच्या बाहेरून एसटी व बसेस सोडण्यात येणार आहे. तर, चर्चगेट, मुंबई सेट्र्ल, दादर, वांद्रे, अंधेरी व बोरीवली स्टेशनच्या बाहेर एसटी व बसेसची सोय करण्यात येणार आहे, अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यात पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील तीन दिवस मुंबईतील जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाडा वगळता विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यात आज आणि उद्या अतिमुसळधार पाऊस कायम राहणार आहे. तर, आज पुणे, रायगड, पालघर, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com