CM Eknath Shinde : जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही

CM Eknath Shinde : जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही

राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल मंत्रिमंडळात सादर होईल. अहवालावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. 20 फेब्रुबारीला विशेष अधिवेशन घेतलं जाईल. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळेल.

इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. आयोगानं जलद गतीनं सर्वेक्षण पूर्ण केलं. कुणबी नोंदी नसलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळेल. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न. सरकारची भूमिका स्पष्ट, टिकणारं आरक्षण देणार.

सव्वा दोन कोटींपेक्षा जास्त कुटुंबांचे सर्वेक्षण यामध्ये करण्यात आले. मागासवर्गीय आयोगाचा हा अहवाल आता मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला जाईल. त्यामध्ये चर्चा करुन शासन निर्णय घेईल. त्यासाठी विशेष अधिवेशन 20 फेब्रुवारीला होईल. असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com