Ashadhi Ekadashi : बीडच्या नवले दाम्पत्याला मानाच्या वारकऱ्याचा मान
Ashadhi Wari 2022 : आषाढी एकादशीचा सोहळ्यास आज पंढरपुरात उत्साहात सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भक्तीभावाने पूजा केली. यावेळी बीडच्या नवले दांमप्ताला पहिला वारकऱ्याचा मान मिळाला. नवले दांमत्य गेल्या १२ वर्षांपासून वारी करत आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा झाली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, स्वत: एकनाथ शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे आणि संभाजी शिंदेंचा पणतू अशा चार पिढ्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं.
मुरली नवले ठरले मानकरी
यंदा मानाचा वारकरीचा मान मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले यांना मान मिळाला. नवले दाम्पत्य बीड जिल्ह्यातील रुई गावचे रहिवासी आहेत. ते गेल्या 12 वर्षांपासून पायी आषाढी वारी करतात. हे दाम्पत्य संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरला पायी आलं आहे.