मुख्यमंत्र्यांसमोरच शिवसेना-भाजपा कार्यकर्ते भिडले

मुख्यमंत्र्यांसमोरच शिवसेना-भाजपा कार्यकर्ते भिडले

Published by :
Published on

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर आहेत. पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री पाहणी करत आहेत. अशात सांगलीच्या हरभट रोड परिसरात असताना मुख्यमंत्र्यांना अचानक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी घेराव घातला. आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एकच घेराव घातला.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनीदेखील घेराव घातला. यावेळी थोडी झुंबड उडाली आणि उपस्थित शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात चकमकदेखील उडाल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी स्वत: पुढे होत निवेदन देण्यासाठी आलेल्या प्रत्येकाचं निवेदन स्वीकारलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com