महाराष्ट्र
Nashik : नाशिक शहरात सिटी लिंक बस चालकांनी पुन्हा दिला संपाचा इशारा
नाशिक शहराची प्रवासी वाहतूक सेवा पुन्हा विस्कळीत होणार असल्याची माहिती मिळत आहे.
महेश महाले, नाशिक
नाशिक शहराची प्रवासी वाहतूक सेवा पुन्हा विस्कळीत होणार असल्याची माहिती मिळत आहे. सिटी लिंक बस चालकांनी पुन्हा संपाचा इशारा देण्यात आला आहे. मुळ वेतनासह 12 हजारांची वाढ करण्यासह विविध मागण्यांसाठी हा संपाचा इशारा देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
महापालिका परिवहन मंडळाला पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र अद्यापही यावर निर्णय न झाल्याने उद्यापासून संपावर जाण्याचा इशारा सिटी लिंक बस चालकांकडून देण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षात आतापर्यंत नऊ वेळेस संप करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.