महाराष्ट्र
शेवटी नागरिकांनी स्वत:च खड्डे बुजवले, खड्ड्यात धानाची रोवणी
25 गावातील नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यात धान रोवणी केली आहे. प्रशासनाच्या तोंडावर पाने पुसत नागारिकांनी स्वत: खड्डे बुजवले.
गोंदिया जिल्हातील बिरसी विमानतळाला जोडणारा आमगाव – कामठा रावनवाडी मार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्याच्या नुतनीकरणासाठी 25 गावांतील नागरिकांनी आज आंदोलन करून खड्ड्यात रोवणी करत दारोदारी देणगी जमा करून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा निर्धार केला.
या रस्त्यावरुन चालणाऱ्या ट्रलचालकांकडून पैसे घेत जेसीबी बोलावून रस्त्यावरील खड्डे बुजवले.