ऑगस्ट महिन्यापासून लहानग्यांसाठी लसीकरण सुरू – केंद्र सरकार
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात चर्चा सुरू असतानाच महामारीची परिस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी सरकार सज्ज होत आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसू शकतो, अशी भीती अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवरच एक महत्त्वाची बातमी सध्या समोर येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी अशी माहिती दिली आहे की, ऑगस्ट महिन्यामध्ये लहान मुलांना दिली जाणारी कोरोना लस भारतामध्ये येऊ शकते. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ही माहिती मंगळवारी झालेल्या भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली आहे.
या बैठकीत मांडवीय यांनी म्हटलंय की, सरकार पुढच्या महिन्यात लहान मुलांसाठी कोरोनाची लस देण्यास सुरू करेल. त्यांनी अशी देखील माहिती दिलीय की, भारत लवकरच सर्वांत मोठा लस उत्पादक देश बनेल कारण अधिकाधिक कंपन्यांना लशीच्या उत्पादनाचं लायसन्स मिळणार आहे.