‘या’ जिल्ह्यांत अजुनही होतात बालविवाह…

‘या’ जिल्ह्यांत अजुनही होतात बालविवाह…

Published by :
Published on

एकविसाव्या शतकात सुद्धा बालविवाह होणे ही समाजासाठी फार लाजिरवाणी गोष्ट आहे. आजही महाराष्ट्रात, विषेश करून मराठवाड्यात अल्पवयीन मुलींना बोहल्यावर चढावे लागते. महाराष्ट्रातल्या बालविवाह होणाऱ्या 10 जिम्ह्यांमधुन सर्वाधिक 8 जिल्हे मराठवाड्यातले आहेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणामधून (NFHS)ही आली धक्कादायक बाब समजत आहे.

सर्वेक्षण क्रमांक 5च्या माहितीनुसार परभणी – ४८, बीड – ४३, धुळे – ४०, सोलापूर – ४०, हिंगोली – ३८, उस्मानाबाद – ३७. औरंगाबाद – ३६, जालना – ३५, नांदेड – ३४, लातूर – ३३ अशी 2019-2020 मध्ये झालेल्या बालविवाहांची आकडेवारी आहे.

ही आहेत कारणे

समाजातील वाईट गोष्टी संपुष्टात आणन्यासाठी आधी त्यामागची कारणे समजून घ्यावी लागतात. काय कारण आहे ज्यामुळे मराठवाड्यातल्या तब्बल ८ जिल्ह्यांचा यात समावेश आहे? संतांची भूमी असलेल्या मराठवाड्यात समाजसुधारक पण नेहमी पुरोगामी विचार रुजवत आले आहेत. पण प्रवास आगामी होण्यापेक्षा दुर्गमी होत आहे. मुली ओझं असण्याची मानसिकता, वय वाढल्यावर हुंडा जास्त घेण्याची परंपरा, कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्यावर एकावर्षाच्या आत मुलीचे लग्न झाले पाहिजे हा अंधविश्वास, असे एक न अनेक करणे आहेत.

मुलीने जातीबाहेर लग्न केलं तर नाक कापलं जाईल, जास्त शिकली तर लग्नासाठी मुलगा मिळणार नाही, मुलगी नोकरी करत असेल तरी अधिक विवंचना, यामगळ्या समाज रुढींतून मुलींना ओझं समजले जाते. कायदा असला तरी त्याच्या खाचाखोचा पण आहेत, त्याला पुरक आहे कम्युनीटी सेंटीमेट, आपल्या समाजाला सर्वात वर ठेवणारी भावना. या परिस्थीतीत फक्त कायदे उपयागी नसून युद्धपातळीवर समाज परीवर्तन करण्याची गरज आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com