Sambhaji Raje Press Conference
Sambhaji Raje Press Conference team lokshahi

Chhatrapati Sambhajiraje : संभाजीराजे पत्रकार परिषदेत काय म्हणाले, जाणून घ्या

'स्वराज्य' संघटना अन् राज्यसभेची अपक्ष निवडणूक
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी आज (12 मे) पत्रकार परिषद घेत आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे. राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी आज दोन महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. आपण भाजपमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. तसेच राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्वराज्य नावाची संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sambhaji Raje Press Conference
Sanjay Raut : "महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे, त्यामुळे स्टंटबाजी बंद करा"

संभाजीराजे काय म्हणाले?

  • राज्यसभेची निवडणूक मी अपक्ष म्हणून लढणार आहे.

  • लवकरच मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. लोकांना स्वराज्याच्या नावाखाली एकत्र करण्यासाठी दौरा करणार आहे. जनतेला एका छताखाली कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करणार.

  • जिथे अन्याय होतो तिथे लढा देणार आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाजारांचे विचार पोहोचवण्यासाठी 'स्वराज्य' संघटना स्थापन करणार

  • राजकारण विरहित राजा लोकांना बघायचा आहे. अजून संघटनेचा चिन्हं, रंग ठरवला नाही. पण हृदयात छत्रपती आहेत,

  • आपली ताकद 'स्वराज्य'मार्फत सगळीकडे पोहोचवायची आहे, ही संघटना उद्या राजकीय पक्ष झाला तरी त्यासाठी माझी तयारी आहे.

  • राज्यातील सगळ्या आमदारांना मी भेटणार आहे. यासह प्रमुख नेत्यांची मी भेट घेणार आहे.

  • मला माझी ताकद समजून घेण्यासाठी आधी मी संघटना स्थापित केली आहे. वेळप्रसंगी मी लोकसभा सुद्धा लढवू शकतो

  • माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला राज्यसभेचा राष्ट्रपती नियुक्त सभासद होण्याची विनंती केली. 2016 मध्ये मी राज्यसभेचा खासदार झालो. त्याबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार.

  • मराठा आंदोलनाच्या वेळी 5 मे ला व्यासपीठावर गेलो आणि वातावरण शांत झालं. मराठा आरक्षण रद्द झालं तेव्हा सरकारच्या विरोधात भूमिका घेतली. कुठे कुणाचे सरकार आहे याचा विचार केला नाही. राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून मी माझे काम सचोटीने केलं.

  • कित्येक वर्षे महाराष्ट्रातील लोकांनी छत्रपती घरण्यावर प्रेम केलं. या प्रेमापोटी मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. गोंदिया वगळता सर्व जिल्हे फिरलो. मराठा समाजाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न मी जाणून घेऊ शकलो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com