महाराष्ट्र
Chhagan Bhujbal on Manoj jarange patil : 'त्या' घटनेत तुमचे लोक नाही तर गुन्हे मागे घ्यायला का सांगता?
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या अनेक ठिकाणी सभा पार पडत आहे. या सभेतून ते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधत असतात.
याच पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाही मराठीच्या पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या कार्यक्रमामध्ये छगन भुजबळ यांची मुलाखत झाली.
या मुलाखतीत छगन भुजबळ म्हणाले की, बीड जळाले त्यामध्ये एक टोळी नव्हती अनेक टोळ्या होत्या. कुणी बोलायला तयार नव्हते तेव्हा मी उभा राहिलो. घरं जाळली गेली. त्याठिकाणी 70 पोलीस होते त्यांना विचारा की लाठीचार्ज का केला. ते तुमचे लोक नाही तर गुन्हे मागे घ्यायला का सांगता? असा सवाल छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना केला आहे.